सेल्फी घेतोय म्हणत त्याने भर विमानतळावर घेतला अभिनेत्रीचा किस; पाहा व्हिडिओ

बिग बॉस फेम अर्शी खान नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. तसेच अर्शी एक मॉडेल असून ती तिच्या लुक्स आणि व्हिडियोमुळेही चर्चेत येत असते. आता अर्शीचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अर्शीच्या एका चाहत्याने सगळ्यांसमोर अर्शीला किस केले आहे. त्यानंतर तो चाहता निघून गेला आहे, हे सर्व पाहून अर्शी पुर्ण दंग झाली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये अर्शी खान विमानतळावर उभी आहे. त्यावेळी तिचे चाहते तिची वाट पाहताना दिसून येत आहे. अशात एक चाहता तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येऊन थांबतो.

सेल्फी घेतल्यानंतर जाता जाता तो अर्शी खानचा हात पकडतो आणि तिच्या हाताला अचानक किस करतो. हे बघून अर्शी पुर्ण शॉक होऊन जाते. तसेच पुढे ती म्हणते चला चला आता पुरे झाले.

अर्शी खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अर्शी खानचे फॅन हा व्हिडिओ पाहून अवाक् झाले आहे. हा व्हिडिओ काही तासातच जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

हा व्हिडिओ पाहून अर्शीच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या व्हिडिओवर खुप लोकांनी कमेंटही केल्या आहेत. यावेळी काहींनी तर पोलिस स्टेशनमध्ये त्या चाहत्याविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे असेही म्हटले आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?
आलिशान गाड्या, मुंबईत बंगला, फ्लॅट; ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले किशोर नांदलस्कर
केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.