एकेकाळी किस केल्यामुळे जेलमध्ये पाठवलेल्या राखीने आता मिकासिंगसोबत केले असे काही की…

सोशल मीडियावर राखी सावंत दरवेळी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. बिग बॉसच्या घरात २००६ साली राखी सावंत आणि मिका सिंग यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून आले होते.

मिका सिंहने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत बळजबरीने राखी सावंतला किस केले होते आणि नंतर मग वाद वाढत गेले. दोघांमध्ये नंतर खूप वाद झाले होते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पण मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

राखीने मीकाच्या विरोधात गैरवर्तनाची केस दाखल केली होती. पण मिकाने नंतर स्पष्ट केले होते की राखीने त्याला आधी किस केले होते. राखी सावंत आणि मिका यांच्यातील हा खूप जुना किस्सा आहे.

पण तरीही त्याचे किस्से आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या दोघांनी जुना झालेला वाद विसरून जाण्याचे ठरवले आहे. एका व्हिडिओमध्ये ते दोघे चांगले बोलताना दिसून आले आहेत.

सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल बियाणी यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. इंटरनेटवर त्या व्हिडीओने कमी धुमाकूळ घातला आहे. दोघेही व्हिडिओत एकमेकांशी चांगल्या प्रकारे बोलताना दिसून येत आहे. मिका सिंहला राखी सावंतने व्हिडिओत सिंग इज किंग म्हटले आहे.

मिका पण यावेळी राखी सावंतला मी शेजारून जाताना तुला इग्नोर करू शकलो नाही असे म्हणून गेला आहे. यावेळी राखी सावंत मिका सिंहला म्हणते की सलमान खानने तिच्या आईच्या उपचाराला मदत केली. या वेळी दोघांनी पण आम्ही चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. हे ऐकून तिथे उपस्थित फोटोग्राफर पण आवाक झाले आहेत.

ताज्या बातम्या
हॉस्पिटलमध्ये तोडफोड करत होता भाजप पदाधिकारी; जेव्हा पोलिसांनी चोपला तेव्हा पडला हातापाया

आता लोकं दयाबेनलाही विसरतील; असित मोदी घेऊन येणार तारक मेहतात नवा ग्लॅमरस चेहरा

होणाऱ्या नवऱ्याने उडवली देशाची थट्टा, संतापलेल्या अभिनेत्रीने थेट लग्नच मोडले; म्हणाली देश व धर्म प्रथम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.