‘कानफाडात मारण्यासाठी हात तयार ठेवा’ किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा

मुंबई। राज्यात सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. व याचेच पडसाद बुधवारी मुंबईतील शिवसेना भवनाच्या बाहेर उमटले. विरोधी पक्ष व सत्ताधारी यांच्यात सतत गेले वर्ष दीड वर्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद पेटत आहेत. अशातच बुधवारी मुंबईतील शिवसेना भवनाच्या बाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

हा वाद अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपा संतापली आहे. त्यामध्ये शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले असून,शिवसेनेवर भाजपकडून टीका करण्यात आली.

मात्र हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला प्रत्युत्तर देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. काय आहे तो व्हिडिओ पाहुयात.

या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, ‘कारण नसताना कानफाडात माराल तर तुम्ही म्हणाल की, वा छान मस्त बसली. अजून जोरात मारायला हवी होती. इतका बुळचटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक.

नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी ते तयार ठेवा’, अशा शब्दात शिवसैनिकांना आक्रमक राहण्याची सूचना देताना बाळासाहेब या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.

या वादानंतर किशोरी पेडणेकर यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे, त्या म्हणाल्या की, शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय, असं सांगतानाच शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

बुधवारी झालेल्या वादानंतर आता भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर ७ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केलाय त्यामुळे आता या मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या रडावर, अटकेची शक्यता
अभिनयापासून दुर जाऊन ‘हे’ काम करते सलमान खानची ‘रेड्डी’ चित्रपटातील अभिनेत्री
काय सांगता! शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचे शिक्षकावरच जडले प्रेम, लग्न करून गाठले पोलीस स्टेशन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.