Share

Kishori Pednekar : याकूब मेमनच्या चुलतभावासोबत फडणवीस अन् राज्यपाल, पेडणेकरांनी थेट फोटोच केले शेअर

kishori

Kishori Pednekar: काही दिवसांपूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचे फोटो सोशल मीडियाववर प्रचंड व्हायरल झाले होते. या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर टीका सुरु आहेत.

यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर करत भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. या फोटोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमन दिसत आहे. ‘भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे,’ असे या ट्विट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी लिहिले आहे.

https://twitter.com/KishoriPednekar/status/1568499447977644033?s=20&t=y6CrOXtf53P6-C4l-_DgnA

याआधी भाजपने किशोरी पेडणेकर यांनी याकूबचा चुलत भाऊ रऊफ मेमनसोबत बैठक घेतल्याचा आरोप केला होता. याचा एक व्हिडिओही त्यांनी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी याचा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना, बडा कब्रस्तानच्या बाहेर पाणी भरले असल्याने मी तिथे पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी बैठकीला कोण कोण उपस्थित होते याची मला कल्पना नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

तसेच सामान्य घरातील लोकांना बदनाम करण्याचे थांबवा, असेही त्या म्हणाल्या आहेत. आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची रऊफ मेमनने भेट घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत.

https://twitter.com/sachin_inc/status/1568503653891457024?s=20&t=R-R2IKs6QGbnqREpBx3tpA

या सगळ्याला प्रत्युत्तर देत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा रऊफ मेमनचा फोटो शेअर केला आहे. तसेच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोला त्यांनी ‘रऊफ मेमन ते हेच का?’ असे कॅप्शन दिले आहे.

याकूब मेमनच्या कबरीला मार्बल आणि लाईटिंगने सजवल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून भाजपकडून शिवसेनेवर प्रचंड आरोप करण्यात आले आहेत. तसेच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड वाद पेटला आहे.

महत्वाच्या बातम्या
संजय राउतांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंचे ठेत भाजपसोबत ‘सेटलमेंट’? राजकीय समीकरण बदलणार
Ravi Rana : राणा विरूद्ध पोलिस संघर्ष पेटला; रवी राणा बदला घेणार, पोलिस आयुक्तांना दिला ‘हा’ इशारा
Eknath Shinde : दररोज ५० मंडळांना भेट देऊन, बाप्पांचे दर्शन घेऊन एकनाथ शिंदेंनी साध्य केले ‘हे’ दोन हेतू
Bindass Kavya : अखेर बिंदास काव्याचा पोलिसांनी लावला छडा, ‘या’ कारणामुळे सोडले होते घर, वाचून हैराण व्हाल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now