किशोर नांदलस्कर यांचा मृत्युपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल; त्यांच्या चेहरेवरचे हास्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच अनेक दिग्गज कलाकारही कोरोनाने हिरावून घेतले आहे. अशात जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

२० एप्रिलला नांदलस्कर यांचे निधन झाले आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीपासून ते कोरोनावर उपचार घेत होते. २ आठवड्यापासून नांदलस्कर ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

किशोर नांदलस्कर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करुन आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. तसेच किशोर नांदलस्कर यांनी चित्रपटांसोबतच काही मालिकेत आणि नाटकातही काम केले आहे.

जिस देश मैं गंगा रहता या हा चित्रपटात त्यांनी बॉलिवूड अभिनेता गोंविदासोबत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी सन्नाटा नावाची भुमिका पार पाडली होती, त्यांची ही भुमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

तसेच किशोर नांदलस्कर यांनी खाकी, वास्तव, सिंघम, सिंबा, अशा चित्रपटातही काम केले आहे. आता त्यांच्या मृत्युपुर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहतेही भावूक झाले आहे.

किशोर नांदलस्कर यांचा हा व्हिडिओ १७ मार्च रोजीचा आहे. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. या व्हिडिओमध्ये ते वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहे. त्यांना या दिवशी निर्माते विजय अर्जुन आणि सुजाता बत्तीन यांनी सरप्राईझ दिले होते.

या व्हिडिओमध्ये ते आनंदाने नाचताना दिसून येत आहे. त्यांनी हा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवारोबत साजरा केला होता. पण कोणालाही वाटले नव्हते, की हा वाढदिवस किशोर नांदलस्कर यांचा शेवटचा वाढदिवस असेल.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: सेक्स एज्युकेशनच्या ‘त्या’ व्हिडिओवर अनेकांचा आक्षेप, अखेर सरकारला घ्यावं लागलं नमतं
रतन टाटा म्हणजे देवमाणूस! कोरोना काळातील मदतीसाठी नेटकऱ्यांकडून टाटांना साष्टांग नमस्कार
शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच धडाधड बदलले कपडे; पहा व्हिडिओ..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.