एक नाही दोन नाही तर किशोर कुमारने केले आहेत चार लग्न; वाचा त्यांच्या पत्नींबद्दल

बोलले जाते की, जोड्या वरुन बनून येतात. तुमच्या आयूष्यात येणारा तुमचा पार्टनर कधी आणि कसा तुमच्या आयूष्यात येणार. हे अगोदरपासूनच ठरलेले असते. जोड्या अगोदरपासूनच बनलेल्या असल्या तरी त्या किती काळ टिकणार हे मात्र कोणाला माहीती नसते.

असेच काही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसोबत होत असते. इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी दोन लग्न केले आहेत. अभिनेत्रींनी देखील दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न केले आहेत. पण आज आम्ही तुम्हासा बॉलीवूडच्या अशा गायकांबद्दल सांगणार आहोत. ज्यांची दोन लग्न झाली आहेत.

हिमेश रेशमिया – बॉलीवूडचे प्रसिद्ध सिंगर हिमेश रेशमिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे चर्चेत असतात. वैयक्तिक आयूष्यामूळे देखील हिमेश अनेकदा बातम्यांमध्ये आले होते. कारण हिमेशचे दोन लग्न झाले आहेत. ही गोष्ट खुप कमी लोकांना माहीती असेल पण ही गोष्ट खरी आहे.

२०१७ मध्ये हिमेश रेशमियाने २२ वर्ष जुने लग्न तोडले होते. त्यांनी त्यांच्या पहील्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दुसरे लग्न केले. २०१८ मध्ये हिमेशने गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ते खुप जास्त चर्चेत आले होते.

उदित नारायण – बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर रंजनासोबत लग्न केले होते. त्यानंतर ते करिअर बनवण्यासाठी मुंबईला आले आणि त्यांना त्यात यश मिळाले. याच कालावधीमध्ये त्यांनी दिपासोबत लग्न केले होते.

त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल घरी समजल्यानंतर खुप मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर त्यांनी पहील्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दिपासोबत दुसरे लग्न केले. सध्या उदित नारायण त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि मुलासोबत आनंदाने राहत आहेत.

सुनिधी चौहान – बॉलीवूड अभिनेत्रींचा आवाज असलेली सुनिधी चौहानने देखील दोन लग्न केले आहेत. वयाच्या आठराव्या वर्षी सुनिधीने दिग्दर्शक बॉबी खानसोबत लग्न केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघे लवकरच वेगळे झाले.

पहीले लग्न तुटल्यानंतर सुनिधीने दुसरे लग्न केले. तिने दुसरे लग्न म्यूजिक डायरेक्टर हितेशसोबल केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे दुसरे लग्न तुटल्याच्या बातम्या येत होत्या. पण सुनिधीने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. सध्या ती तिच्या पतीसोबत राहत आहेत.

किशोर कुमार – बॉलीवूडचे एव्हरग्रीन गायक किशोर कुमार यांनी एक नाही दोन नाही तर तीन नाही चार लग्न केले होते. पण त्यांच्या चारही लग्नाने त्यांना आनंद दिला नाही. ते नेहमी एकटे आणि दुखी होते. किशोर कुमारचे पहीले लग्न रुमा गुहासोबत झाले होते. पण लवकरच दोघे वेगळे झाले.

त्यानंतर त्यांच्या आयूष्यात मधूबालाने प्रवेश केला. दोघांनी लग्न केले. लग्नानंतर मात्र यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर किशोर कुमार अभिनेत्री योगिता बालीच्या प्रेमात पडले. पण हे ही लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर त्यांनी वीस वर्ष छोट्या लीना चंदावरकरसोबत लग्न केले.

महत्वाच्या बातम्या –
आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले
‘जुबेदा’ चित्रपटानंतर करिश्मा कपूरचे कौतूक झाले तर मनोज बाजपेयीला सावळ्या रंगामूळे ठेवण्यात आली नाव
मिसेस कोहली बनण्यापूर्वी अनूष्का शर्माचे होते अनेक अफेअर्स; नाव वाचून धक्काच बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.