पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप(BJP) आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात(Goa) भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(kirit sommya tweet on goa shivsena sitiuation)
शिवसेनेला गोव्यात अजून देखील खाते उघडता आले नाही. यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी आणि आदरणीय संजय राऊतजी गोव्यात शिवसेना कुठं आहे!!??”
हे ट्विट करत भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. किरीट सोमय्यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1501778345272692740?s=20&t=Q4AOHlvqV4HLYGRZVITuvA
गोव्यात निवडणुकीच्या आधीच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड केलं होतं. तसेच भाजपच्या आणखी बड्या नेत्यांनी गोव्यामध्ये बंद केलं होते. पण त्याचा फटका भाजपाला बसला नसल्याचे या निकालांवरून दिसत आहे यंदा गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी ३०१ उमेदवारांनी भवितव्य आजमावलं होतं.
गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान झाले होते. ४० जागांपैकी सर्व जागांचे कल आले असून भाजप २१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १२ जागांवर पुढे आहे. इतर पक्षांचे उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहेत. गोव्यात बहुमतासाठी २१ जागांची गरज आहे. त्यामुळे भाजपसाठी ही आशादायक बातमी आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर आहेत. त्यामुळे प्रमोद सावंत यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे मॉन्सेरा हे आघाडीवर असून दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर पिछाडीवर पडले आहेत. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर सध्या आघाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बार फुसका? राष्ट्रवादी काँग्रेसने केला मोठा खुलासा
युपीच्या निवडणुकीत योगी पुढे जाणार हे आधीच निश्चित होतं; भाजपच्या विजयानंतर राऊतांची कबूली
पुणे हादरलं! स्मशान भूमीत दोन मित्र भुतासारखे पिसाटले, एकमेकांसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य