Share

मोठी बातमी! किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच पळ काढला

kirit sommiya

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणातील आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी किरीट सोमय्यांनी(Kirit Sommiya) पत्रकार परिषद आयोजित केली होती.(kirit sommiya escape from press conference)

पण भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच पत्रकार परिषद आटोपली आहे. त्यामुळे पत्रकारांनी किरीट सोमय्यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सैनिक बबन भोसले यांनी या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम ४२०, ४०६, ३४, अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत फाइल्स उघड केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप केला होता.

“आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमा केला होता. मुंबईमध्ये सोमय्यांनी अनेक लोकांकडून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमवला होता. या पैशाचे काय झाले?”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

यावर स्पष्टीकरण देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्या उपस्थित राहिले. पण पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलं नाही. उलट पत्रकारांनी आयएनएस विक्रांत भ्रष्टाचार प्रकरणाचे प्रश्न विचारताच किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली आणि गाडीत बसून निघून गेले.

महत्वाच्या बातम्या :-
मंदानाने उघड केले मोठे रहस्य, म्हणाली, ‘माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते’
स्टार प्रवाहवरील ‘ही’ प्रसिद्ध मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; त्याजागी दिसणार नवीन मालिका
ईडीने संजय राऊतांवर कारवाई का केली? शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींनाच विचारला जाब

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now