विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर घोटाळ्याचे गंभीर आरोप, पोलीस दलातून हकालपट्टीची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी अशी मागणी केली आहे की विश्वास नांगरे पाटलांना पोलिस दलाच्या नोकरीतून मुक्त करा. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

किरीट सोमय्या असेही म्हणाले की, जालना साखर कारखान्याच्या दुसऱ्या भागीदार रूपाली विश्वास पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुंबई पोलिस दलाचे संयुक्त आयुक्त आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केले पाहिजे. शरद पवार यांनी दिलेली धमकी ही अनिल देशमुख की अजित पवारांमुळे? देशमुखांवर प्रेम आहे की अजित पवार यांची काळजी आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, ठाकरे सरकारने जनतेला लुटले आहे. महाराष्ट्रात कोरोनाने दुप्पट रूग्ण मयत झाले आहेत. तेव्हा ठाकरे सरकार हे पैसै मोजत होते. घोटाळेबाजांना शिक्षा झाली पाहिजे, असंही किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, किरीट सोमय्या म्हणाले होते की दिवाळीनंतर ३ मंत्री आणि जावयांचे फटाके फोडणार.

घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचे राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खुश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खुश केलं.

एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. आता किरीट सोमय्यांनी विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर आरोप केले आहेत आणि नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या
गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाचे नाव, उद्धव ठाकरेंनी ताबडतोब केली ‘ही’ कारवाई
ताडोबात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी; पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडली घटना
मोदी सरकार दोन मोठ्या सरकारी कंपन्यांची विक्री करण्याच्या तयारीत, नावे वाचून धक्का बसेल
गोखलेंना वाटलं त्यांना पण पद्मश्री भेटेल म्हणून त्यांनी कंगनाच्या वक्तव्याला समर्थन दिलं; थोरात स्पष्टच बोलले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.