ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या हे आपल्या वक्तव्यासाठी आणि विरोधकांना धारेवर धरण्यासाठी प्रसिध्द आहेत. नुकतेच किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पाणी पुरावे आयकर विभागाकडे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहेत. “मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत.

हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. तेवढंच नव्हे तर बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवल आहे. या कंपनीवर २०१७-१८ मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे.”

“मरू भूमी कंपनीत ३ कोटी ५ लाख रक्कम दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटींचे तर पुरावे आहेत आमच्याकडे. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नी शाएदा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे शेअर्स दाखवले आहेत.

२०१८-१९ मध्ये मुश्रीफ परिवारावर इन्कमटॅक्स सर्च झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी-धनाजी साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहेत, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
मगरीचे पोट कापल्यानंतर शिकारी झाला सुन्न; ६००० वर्ष जुना ‘खजिना’ मिळाला…
गणेशाच्या प्रसादासाठी बनवलेले लाडू खाण्याचे फायदे काय?; वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात..
मध्य प्रदेशच्या शिक्षण धोरणात मोठा बदल; प्रभू रामचंद्रांमधील इंजीनियरिंगचे गुण, रामचरितमानस, ध्यान, महाभारताचे दिले जाणार मुलांना धडे
‘…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला’; संजय राठोड यांचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.