“गृहनिर्माण खात्यात आव्हाडांचा राईट हँड वसुली करतोय”; सोमय्या यांनी आव्हाडांवर केला गंभीर आरोप

 

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंगांनी लेटर बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली आहे.

या लेटरमध्ये परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सुद्धा परमबीर सिंग यांनी केला होता.

असे असताना असाच एक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र यांच्यावर केले आहे. गृहनिर्माण खात्यात सुद्धा एक मोठी वसुली गँग असल्याचा धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे, त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रवीण कलमे नाव असलेला हा व्यक्ती आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली करत आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी ट्विट करत केला आहे.

राज्यात सध्या १०० रुपये प्रति स्क्वेअरफूट असा एसआरए, म्हाडा आणि बिल्डरांसाठी दर सुरू आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजेच प्रवीण कलमे हे महानगरपालिका, म्हाडा, एसआरएमध्ये १०० बिल्डर्सच्या विरोधात १०० आरटीआय करतात. त्यावर लगेच आव्हाड अहवाल सादर करण्याचा आदेश देतात. त्यानंतर लगेच त्यांच्या वसुली गँगचे अधिकारी लगेच कामाला लागतात, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गृहनिर्माण विभागातील वसुली गँग संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहीती पण किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पोलिसांकडे या वसुली गँग संदर्भात पुरावे देखील सादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.