kirit somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चर्चेत येत असतात. आता किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या एका वादात सापडला आहे. एखाद्या राजकीय प्रकरणामुळे नाही, तर तो त्याच्या शिक्षणामुळे वादात आला आहे.(Neel Somaiah, Kirit Somaiah, BJP leader, Ph.D)
मुंबई विद्यापीठाने नील सोमय्या यांना फक्त १४ महिन्यात पीएचडी बहाल केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठासह नील सोमय्या सुद्धा सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. नील सोमय्या यांनी ज्या पद्धतीने पदवी बहाल केली गेली आहे ती अयोग्य आहे असे नाही. पण या गोष्टीमध्ये मुंबई विद्यापीठाने दाखवलेली तत्परता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
नील सोमय्या यांनी पीएचडीसाठी ऑगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला होता. त्यानंतर फक्त दीड महिन्यातच नील सोमय्या यांना तोंडी परिक्षेसाठी बोलवण्यात आले होते. ही तोंडी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नील सोमय्या यांना पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली आहे.
नील सोमय्या यांना इतक्या वेगाने मिळालेली पीएचडीची पदवी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही हा चर्चेचा विषय ठरत आहे. नील सोमय्या यांना इतक्या कमी वेळात पीएचडी कशी मिळाली, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
नील सोमय्या यांनी पीएचडीची नोंदणी जून २०२१ मध्ये केली होती. त्यानंतर त्यांना १४ महिन्यांत महिन्यात त्यांना पीएचडीची पदवी देण्यात आली आहे. नील सोमय्या हे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक आहे. एम ए खान हे नील सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक होते.
२०२१ मध्ये नील सोमय्या यांना त्यानंतर वर्षभरात नील सोमय्या आपला नवीन प्रबंध सादर केला. त्यानंतर नील सोमय्या यांचे मार्गदर्शकही शॉक झाले आहेत. नील सोमय्या यांना पदवी देताना विद्यापीठाने सर्व प्रक्रिया पार पाडली आहे. पण एरवी मुंबई विद्यापीठ कोणत्याही पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या प्रबंधाबाबत इतकी तत्परता दाखवत नाही, असे एम ए खान यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Kirit Somaiya : ट्विन टॉवर पाडल्यानंतर किरीट सोमय्यांचा मुंबईतील इमारतींवर निशाणा, सरकारकडे केली ‘ही’ मागणी
Kirit Somaiya : वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहा, ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्यांना कोर्टाने झापलं
किरीट सोमय्या यांनी केलेल्या ‘त्या’ व्यक्तव्यावर शिंदे गट प्रचंड नाराज; थेट फडणवीसांकडे केली तक्रार