Share

भ्रष्टाचाराप्रकरणी सोमय्या पितापुत्रांच्या अटकेचा मार्ग मोकळा; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांच्या(Kirit Somaiya) अडचणीत वाढ होणार आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.(Kirit Somaiya’s pre-arrest bail application has been rejected)

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात निकाल देताना किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आम्ही या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात अपील करणार आहोत. आताच या प्रकरणात काही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांच्या वकिलांनी दिली आहे. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

नील सोमय्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती उद्या सुनावणी होणार आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात गोळा केलेल्या पैशांचा हिशोब न देता आल्यामुळे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी सैनिक बबन भोसले यांनी या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी या प्रकरणात कलम ४२०, ४०६, ३४, अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत फाइल्स उघड केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप केला होता.

“आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमा केला होता. मुंबईमध्ये सोमय्यांनी अनेक लोकांकडून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमवला होता. या पैशाचे काय झाले?”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

महत्वाच्या बातम्या :-
हवेत अडकलेत ४८ जीव, ड्रोनद्वारे पोहोचवले जात आहे अन्न-पाणी, पहा झारखंड रोपवे दुर्घटनेचे थरारक फोटो
…म्हणून कीर्तनकारांच्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ कुणाला पाठवू नका; तृप्ती देसाईंचे आवाहन
मला आई व्हायचं आहे आहे माझ्या पतीला पॅरोल द्या, पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now