मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयाच्या तोडकामाच्या कारवाई प्रकरणी हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला फटकारले आहे. हायकोर्टानं बीएमसीची कारवाई अवैध ठरवली आहे. पालिकेने केलेली ही कारवाई सत्तेचा आणि अधिकारांचा दुरोपयोग असल्याचं हायकोर्टानं म्हटले.
याचाच धागा पकडत भाजपने राज्य सरकारवर टिका केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या निकालामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आता संजय राऊतांची बोलती बंद झाली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
V welcome Highcourt Order on #KanganaRanaut demolition case. Mumbai Mayor & BMC Commissioner should Resign. #SanjayRaut ki Bolti Bandh Ho Gayi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/DhWqQsZ6QI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 27, 2020
तसेच ते पुढे बोलताना म्हणतात, ‘कंगना राणावत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मुंबईच्या महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी आता राजीनामा द्यायला हवा. संजय राऊत यांची तर बोलतीच बंद झाली आहे,’ असे त्यांनी व्हिडीओ ट्विटवर पोस्ट करत म्हंटले आहे.
दरम्यान, ट्विटवरुन एक ‘अर्णब गोस्वामी पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचे थोबाड फुटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळे झाले,’ अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टिका केली आहे.
दरम्यान, कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत म्हणत मुंबई महापालिकेने ऑफिसवर हातोडा मारला होता. मात्र ही कारवाई अवैध असल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दणका दिला आहे.
कार्यालय तोडल्यानंतर कंगणाने हायकोर्टात या प्रकरणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती याचा निर्णय आज कोर्टाने दिला. कंगणाचा ऑफीसवर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही अवैध आहे असे कोर्टाने सांगितले आहे.
तसेच महापालिकेने कंगणाला दिलेली नोटीस अवैध आहे त्यामुळे महापालिकेला भरपाई द्यावी लागणार आहे. कंगणाच्या विनंतीचा विचार करून नुकसानीचे मूल्यमापन केले जाईल आणि नंतर त्याविषयी निर्णय दिला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना लस गावागावात पोहचवण्यासाठी मोदी सरकारने राज्यांना पाठवला ‘हा’ प्लान
एबीपी माझा पुन्हा वादात; ‘या’ नेत्याने केला खोटी बातमी दिल्याचा आरोप; माफीची मागणी
कंनगा राणावतबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, सोडून द्या..