पुरावे मिळालेत, सोमवारी आणखी एका मंत्र्याचा घोटाळा समोर आणणार; किरीट सोमय्या पुन्हा बाॅम्ब फोडणार

भाजप नेते किरीट सोमय्या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ते महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दल खुलासेही करताना दिसून येत असतात. आताही त्यांनी सोमवारी एका बड्या मंत्र्यांबाबत खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्यांच्या घोटाळ्याचा खुलासा मी सोमवारी करणार आहे. त्या मंत्र्याविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या या खुलास्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

या मंत्र्याने कोलकत्ता कंपनीतील २७ कोटींच्या ट्रान्जेक्शनमध्ये घोटाळा केला आहे. याचे सर्व पुरावे माझ्या हाती लागलेले आहे. पुढच्या आठवड्यात मी या मंत्र्याचे नाव सर्वांसमोर जाहीर करणार आहे. मनी लाँड्री, फेरा, फेमा हे सर्व कायदे या घोटाळ्याला लागू होणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शुक्रवारीही पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय आणि मंत्री अनिल परब यांच्याबद्दलही अनेक नवीन खुलासे केले आहे.

अनिल परब यांचे निकवर्तीय बजरंग खरमाटे यांची ७५० कोटींची संपत्ती असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. मी त्या ४० संपत्त्या बघितल्या आहे. तसेच याबाबतची माहिती ईडी आणि आयकर विभागाला दिलेली आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटे होते.

शरद पवार म्हणताय की ईडीचा गैरवापर केला जात आहे. पवार यांनी भावना गवळीला निर्दोष म्हटले आहे. पण भावना गवळींनी एका सहकारी बँकेतून ४० वेळा पैसे काढले आहे आणि प्रत्येक वेळेस काढलेली रक्कम ही २१ लाखांच्यावर आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार”
मोठी बातमी; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हाती घड्याळ; लवकरच करणार पक्षप्रवेश
‘मुंबई इंडियन्स’ टीमला मोठा धक्का! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.