ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत

मुंबई। भाजप नेते किरीट सोमय्या यांची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरात जाण्यास मनाई केल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत. मुंबईत परतताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

कोल्हापुरात जात असताना किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर त्यांनी मुंबईत कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलत सोमय्या यांचा जयजयकार केला. मात्र आता मुंबईत परतताच सोमय्या यांनी राष्ट्रवादीकडून आता थेट शिवसेनेकडे आपला निशाणा साधला आहे.

त्यांनी शिवसेना खासदार त्यांनी संजय राऊत यांच्यावर 55 लाख रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्हाबंदी तसेच महाविकास आघाडी सरकारचे कथित घोटळे यांच्यावर भाष्य केले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले. “शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यासोबत जे झाले, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे भाष्य केले.

हे तेच आहेत ज्यांनी बीएमएसी बँकेच्या डीपॉझिटरचे 55 लाख रुपये ढापले होते. हाच चोरीचा माल त्यांना परत करावा लागला होता,” असे विधान सोमय्या यांनी केले. म्हणजेच संजय राऊत यांनी बिएमसी बँकेमध्ये 55 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता असा अप्रत्यक्ष आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

यावेळी सोमय्या यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे सरकार, मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा ‘४० चोर मंत्रिमंडळ असा उल्लेख करत आता गंभीर लढाईला सुरुवात झाली असून आम्ही आता या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच पुढे बोलताना त्यांनी मी येत्या सोमवारी अलिबागला जाणार आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगल्याचा घोटाळा केला आहे. याच बंगल्यांची मी अलिबागला जाऊन पाहणी करणार आहे. तसेच येत्या गुरुवारी मी अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहे. पारणेरमध्ये साखर कारन्यामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्याचीही पाहणी करणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.

तसेच किरीट सोमय्या एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी पुन्हा हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुश्रीफ घोटाळेबाज असून त्यांना मुख्यंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यंत्री अजित पवार पाठीशी घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे.

मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मी आता थांबणार नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असंही सोमय्या म्हणाले.

ज्यावेळी सोमय्या मुंबईत परतले त्यावेळी कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलत सोमय्या यांचा जयजयकार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी दिल्या.

 

महत्वाच्या बातम्या

बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी “या” दोन स्पर्धकांमध्ये तुफान राडा; कोण होणार एलीमीनेट?
युपीतील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह लटकलेला आढळल्याने खळबळ
आर्या आंबेकरचा मोठा खुलासा, प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडले मौन..
मोठी बातमी: अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.