राठोड गेले, देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर; भाजप नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी बोलताना केला आहे.

आता नवा वसुली मंत्री कोण?
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

त्या म्हणतात, ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

धृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गुंदेचा बंधूंवर विद्यार्थिनींनी केले लैंगिक छळाचे आरोप

“माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि घरातले सगळेच आजारी”

रविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.