रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई | सध्या राज्यात अर्णब गोस्वामी अटक प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अन्वय नाईक यांच्या कुटुंबानं ठाकरे परिवाराशी आर्थिक व्यवहार केल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्या व्यवहाराची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेला द्यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली.

सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट केली आहेत. ‘ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

याबाबत बोलताना सोमय्यांनी म्हंटले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. २१ मार्च २०१४ रोजी यासाठी व्यवहार झाला. ठाकरे आणि वायकर यांनी नाईक कुटुंबाकडे सदर जमीन खरेदी केली. नाईक कुटुंबासोबत असे आणखी किती व्यवहार झाले? अशा किती जमिनी घेण्यात आल्या?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
खळबळजनक! ‘अन्वय नाईक यांनी आईची ह.त्या करुन नंतर आत्मह.त्या केली’
संशोधनातून खुलासा; असा आवाज असणारे पुरुष धोकेबाज असतात, वाचा सविस्तर
सरपंचाने गावकऱ्यांना दिवाळीचे असे काही गिफ्ट दिले की गावकरी कधीही विसरणार नाहीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.