“महाराष्ट्रात कोविड मृत्यु तांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

राज्यभराच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या लोकांचीही संख्या वाढत आहे. अशात रुग्णालयाच्या बेजाबदारपणामुळे अनेक धक्कादायक घटनाही घडत आहे.

आज विरारमधल्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला आहे. आता घटनेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात कोविड मृत्यु तांडव सुरु आहे. ठाकरे सरकारने हा आता प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता केंद्र सरकार आणि लष्काराची मदत घेतली पाहिजे. तसेच राजेश टोपे यांना घरी बसवले पाहिजे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विट करत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

विरार कोविड हॉस्पिटलमधे १३ मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारने कोविड रुग्णांसाठी भारत सरकार आणि सैन्याची मदत घ्यावी. तज्ञांद्वारे कोविड केंद्रांचे ऑक्सिजन आणि आग सुरक्षेचे ऑडिट करावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करावे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

दरम्यान, आज विरारमध्ये असलेल्या विजय वल्लभ या कोविड रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये भीषण आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या आयसीयुमध्ये १५ रुग्ण होते. त्यामधल्या १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या घटनेने पुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाने आई देवाघरी गेली, दु:ख सहन न झाल्याने लेकीने मारली थेट इमारतीवरून उडी; पाहा व्हिडिओ
बाॅलीवूड अभिनेता अवघ्या चारच दिवसांत झाला कोरोनामुक्त! त्यामागील कारणही सांगीतले
ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.