अर्णबला भेटायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी उचलून फेकून दिले

मुंबई | रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून अलिबागला नेलं आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली असून अलिबागला नेलं आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सोमय्या यांनी सांगितले की, “आपण अर्णब गोस्वामी यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, पोलीस कशा पद्धतीने दादागिरी करत आहेत हे पाहण्यासाठी आलो होतो. फक्त पाहत होतो तर पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं याचा मी निषेध करतो.’

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये,’ अशा तिखट शब्दात भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
“अर्णब यांच्या तोंडातून काही नावे बाहेर पडतील अशी भाजपला भिती”
अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामींवर केले ‘हे’ गंभीर आरोप; प्रकरण चिघळलं
मनुस्मृती प्रकरण: अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.