किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच, धमक्यांमुळे मोदी सरकारने दिली Z प्लस सुरक्षा

मुंबई । गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या चर्चेत आहेत. ते महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. असे असताना यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल 40 CISF जवानांच्या सुरक्षेचे कवच असेल.

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील ११ जणांवर आरोप केले आहेत. तसेच हे मंत्री दिवाळीपर्यंत जेलमध्ये असतील असेही त्यांनी म्हटले होते. यामुळे त्यांना त्यांना धमक्या आल्या होत्या, यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता सोमय्यांना Z दर्जाची सुरक्षा असेल.

धमक्या येत असल्याने किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. यानंतर लगेच त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती हे जवान असतील. अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी हे जवान काहीही करतात. कुठल्याही प्रसांगास सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे १९ बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे. ठाकरे यांचे इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा त्यांनी दिला.

आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब, भावना गवळी यांची चौकशी सुरू आहे. तसेच जितेंद्र आव्हाड तुम्हीही बॅग भरा, असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान आता किरीट सोमय्या हे बारामती दौऱ्यावर आहेत. अनेक नेत्यांच्या मालमत्तेची ते चौकशी करत आहेत. यामुळे आता ते कोणती नावे पुढे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनधिकृत मालमत्तेची पाहणी करण्यासाठी ते कोकणात देखील गेले होते.

ताज्या बातम्या

देव तरी त्याला कोण मारी! मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आली अन्…

आज मला असह्य दुख: होतय! आईच्या निधनानंतर अक्षयकुमारने जे लिहीलंय ते वाचून ढसाढसा रडाल

पंतप्रधान जागतिक दहशतवादी तर गृहमंत्र्याच्या डोक्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षिस; जाणून घ्या अफगाणिस्तानचे टॉप 6 मंत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.