मुंबई पोलीसांनो माझी माफी मागा, नाहीतर..; किरीट सोमय्यांची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळा प्रकरणी आरोप केले असून यामुळे राजकीय वर्तुळ चांगलेच तापलेले होते. भाजप नेते किरीट सोमय्या हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरकडे निघाले होते.

किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबई CSMT स्टेशनवरून कोल्हापूरला रवाना होण्यासाठी निघाले होते.परंतु पोलिसांनी कोल्हापुरला जाण्याआधीच त्यांना कराड येथे उतरण्यास सांगितले. दौऱ्यात अडथळा आणल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी चक्क मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार केली आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशा प्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात पोलिसांविरोधातच ही तक्रार केली आहे.

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यानंतर जाऊ दिलं. त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी करत मला अडवले, याप्रकरणी आधिकृत तक्रार करण्यासाठी मी आलो आहे.

पुढे ते म्हणाले, “मी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. २० तारखेचा स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी पुढील मंगळवार आणि बुधवारी जाणार आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

दरम्यान त्यांना दौऱ्यासाठी परवानगी मिळेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशाप्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? किरीट सोमय्याला एवढे का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानतंर हे काय करणार?”.

 

महत्वाच्या बातम्या
काय सांगता! चिकनपेक्षा मेथी महाग, भाज्यांचे दर शंभरीपार, शेतकरी सुखावला
“५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात, मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”
बिग ब्रेकींग! आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएल स्थगित होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.