अटक करा, नजरकैदेत ठेवा, काहीही करा; मी ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारच

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून त्यांच्या घराला छावणीचे रूप आले आहे. याबाबत किरीटी सोमय्या यांना विचारले असता मला नजरकैदेत ठेवले असून मुंबई पोलिस मला अटक करू इच्छित आहेत, पण मी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करत राहतील असे म्हंटले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध करत कडाडून टीका केली आहे.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आज किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार होते मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांनी यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलण्याबाबत नोटीस बजावली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा बंदोबस्त केल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे.

किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिस तैनात केल्या प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपले मौन सोडले आहे. दरेकर म्हणाले की, राज्य सरकार पोलिसांच्या मदतीने भाजप नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने आपली भूमिका बदलावी, अन्यथा भाजपही आक्रमक होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी संबंधित प्रकरणाचा खुलासा करत सांगीतले की याआधी किरीट सोमय्या यांच्यावर परभणीमध्ये त्यांच्या कारवर शाही फेकण्याचा प्रकार झाला होता. कोल्हापूरमध्ये देखील अशी तणावपूर्वक परिस्थिती उद्भवू शकते. तरी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना सहकार्य करत एक जबाबदार नागरिक असल्याची भूमिका पार पाडावी.

किरीट सोमय्या यांनी ही ठाकरे सरकार आणि दिलीप वळसे पाटील यांची गुंडगिरी असल्याचे सांगीतले आहे. या सर्व प्रकरणाबाबत बोलतानाचा किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. संबंधित प्रकरणामुळे भाजप आणि ठाकरे सरकार एकमेकांसमोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते एकाच मंचावर असताना भावी सहकारी असा उल्लेख केला होता आणि आत्ता एका भाजप नेत्याला असे नजरकैदेत ठेवल्याचा आरोप झाल्यामुळे ठाकरे सरकारच्या भूमिकेमुळे गोंधळाचे वातावण निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

 

महत्वाच्या बातम्या
बिग ब्रेकींग! पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह यांची निवड, राज्याला मिळणार पहिला दलित मुख्यमंत्री
“सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवणार, त्यांचा हा शेवटचा स्टंट असेल”
धक्कादायक! कर्म पूजेदरम्यान विसर्जनासाठी गेलेल्या ७ मुलींचा तलावात बुडून मृत्यू
खाणीत काम करताना मजुराला भेटला तब्बल ४० लाखांचा हिरा, एका रात्रीत झाला लखपती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.