मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘ मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवतात, अशी टीका सोमय्या यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ३ महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे,’ असेही सोमय्या म्हणाले.
…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही
या प्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ‘धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे,’ ते म्हणाले.
धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा….
‘सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा,’ अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केली आहे.
तसेच त्या पुढे बोलताना म्हणतात, ‘कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी,’ असा इशारा उमा खापरे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा जावई एनसीबीच्या रडारवर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; ‘एवढ्या’ दिवसांसाठी घातली बंदी
‘हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील’