“किरीट सोमय्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर दुसऱ्या दिवशी सरकार बरखास्त होईल”

मुंबई । भाजप नेते किरीट सोमय्या राज्य सरकारवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. असे असताना त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. यावर आता किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त झालेले असेल, असा इशाराच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांंनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सोमय्या यांनी केल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार विरोधात रान उठवले आहे. अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप केले गेले आहेत. यामुळे सोमय्या चर्चेत आले आहेत.

सोमय्या त्यांनी यामध्ये थेट शरद पवार यांचे नाव देखील घेतले आहे. ते म्हणाले, हसन मुश्रीफ साहेब १२७ कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का? असे त्यांनी म्हटले आहे.

सेनापती घोरपडे कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे सरकार शरद पवार चालवतात. त्यामुळे याची माहिती त्यांना आहे. हे सरकार पवार आणि ठाकरे चालवतात, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

ते म्हणाले, अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असे ते म्हणाले. काल ते कोल्हापूरमध्ये जात असताना त्यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवले. आता सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून २७ तारखेला उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांचा घोटाळ्यांची देखील पाहणी करणार आहे. यामुळे आता काय माहिती पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.