Share

Kirit Somaiya : ट्विन टॉवर पाडल्यानंतर किरीट सोमय्यांचा मुंबईतील इमारतींवर निशाणा, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Kirit Somaiya

Kirit Somaiya : नोएडामधील ट्विन टॉवर काल २८ तारखेला पाडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबईत अनेक बिल्डर्स नागरिकांची फसवणूक करतात. तिथे आजही अनेक इमारती या बेकायदेशीरपणे बांधलेल्या आहेत. अनेक टॉवर्स बिल्डर्सने अनधिकृतपणे बांधले आहेत. अनेक प्लॉट धारक ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) मिळाला नसल्याने चिंतेत आहेत. त्यामुळे मुंबईतील बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचे विशेष ऑडिट करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

तसेच किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. यासोबतच प्रताप सरनाईक महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांची विहंग इमारत ही अनाधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मला कोणत्याही एका बिल्डरचं नाव घ्यायचं नाही. पण ही गोष्ट खरी आहे की, २०१० मध्ये लोक राहायला गेले, पण २०२२ पर्यंत ओसी मिळाली नव्हती. मी विषय उचलल्यानंतर दंड ठोठावण्यात आला होता, जो मागील सरकारने माफ केला. आता विहंग गार्डनच्या लोकांना ओसी मिळाली आहे,”

“काल नोएडातील अनधिकृत टि्वन टॉवर पाडण्यात आले आहे. मुंबईत असे शेकडो अनधिकृत टॉवर्स, हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्षे बांधण्यात आले आहेत. उभे आहेत त्यातील मध्यमवर्गीय सदनिकाधारक असुरक्षित, भीतीत आहेत त्यांचे काय?, अशी चिंता भाजपचे माझी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून नोएडातील टि्वन टॉवर्स पाडण्याचे आदेश आले त्याचे स्वागत आहे. याच्यातून प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अशा हजारो सदनिकाधारकांची काळजी करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Chandrakant Khaire : ”शिंंदे गटातील १०-१५ आमदार आमच्या संपर्कात, आम्हाला फोन करून म्हणतात, आमचं चुकलं”
‘हिंदू सण आले की निर्बंध, बाकीच्या सणांना रिलॅक्स’- श्रीकांत शिंदे
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! माजी काँग्रेस आमदार शिवबंधन बांधणार, संतोष बांगर यांना देणार टक्कर
Hardik Pandya: यावेळी हार्दिक पांड्याने वाचवलं, पुढच्या वेळी अशी चूक करू नकोस, चाहत्यांनी विराटला फटकारलं

ताज्या बातम्या इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now