मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दरम्यान, आता सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून आपली ही संपत्ती लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणतात, ‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबाग मध्ये असलेली ५ कोटी रूपयांची संपत्ती माहित असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नाही. मी स्वत: या प्रकरणाचा जाऊन तपास केला, असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
संजय राऊतांचा सोमय्यांना जाहीर इशारा…
किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली. ‘ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात,’ असे राऊत म्हणाले.
ते म्हणाले, ‘प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
‘सीरम इंस्टिट्यूट’ला मिळाली केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर; किंमतही केली जाहीर
‘विरुष्का’च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन; विराटने दिली आनंदाची बातमी
सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले…