किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर आरोप, अजित पवारांनी एका वाक्यात लावला निकाल…

मुंबई । भाजप नेते किरीट सोमय्या राज्य सरकारवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. यामुळे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. आता त्यांनी यामध्ये थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले आहेत. ते म्हणाले, अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असे ते म्हणाले.

यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांवर निशाणा साधला. यावर त्यांनी जास्त मोठी प्रतिक्रिया दिली नाही.

गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. काल ते कोल्हापूरमध्ये जात असताना त्यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवले. पुन्हा सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून २७ तारखेला उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांचा घोटाळ्यांची देखील पाहणी करणार आहे. यामुळे आता काय माहिती पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले आहेत.

उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केला आहे, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु आहे. अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. मला रोखणार आहे का?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

मला अंबाबाईच्या दर्शनापासून रोखले, स्टेशनबाहेर मला रोखले, ट्रेन मिळणार नाही हे पाहिले, धक्काबुक्की केली. यामुळे मी आता गप्प बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? याचे उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असेही ते म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.