किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक, म्हणाले 10 लोकांना जेलमध्ये टाकणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री..

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. अनेक नेत्यांनी घोटाळा केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे या सगळ्यांना जेलमध्ये जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे ते अनेक ठिकाणी दौरे देखील करत आहेत.

असे असताना आता देखील त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, राज्यातील ठाकरे सरकार आता नौटंकी करत आहे. पवार साहेब कुणा- कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहे, असे म्हटले आहे.

तसेच विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करू, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्र्यांवर देखील त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना सोमय्या म्हणाले की, बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटीं ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला आहे.

या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे आहेत.

या लोकांवर लवकरच कारवाई होणार आहे. आता पवार साहेब कुणा-कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरूवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे. यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यामुळे आता अजून दहाजण कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमय्या यांच्या आरोपानंतर अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरी देखील चौकशी करण्यात आली होती. बारामतीमध्ये देखील अनेक ठिकाणी चौकशी करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.