१२०० रूपयांत सुरू केलेला व्यवसाय पोहोचला ५० हजार कोटींमध्ये, वाचा किरण मजूमदार यांची यशोगाथा

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या किरण मुजूमदार शॉ यांना कोरोनाची लागण झाली होती. बायोकॉन लिमिटेड चेअर पर्सन किरण मुझूमदार शॉ यांनी ट्वीट करून ही माहिती दिली होती. दरम्यान ही काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे आता त्या ठीक आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सौम्य लक्षणे आहेत. त्यांनी ट्विटमध्ये असेही लिहिले होते की मला आशा आहे की मी लवकर ठीक होईल. आज आम्ही तुम्हाला किरण मुजूमदार शॉ यांची यशोगाथा सांगणार आहोत.

ज्यांना किरण या कोण आहेत हे माहित नाही तर तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की देशातील सर्वात मोठी बायो फार्मा कंपनीच्या संस्थापक किरण मजूमदार यांनी फेडरेशन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया येथे शिक्षण घेतले आहे.

त्या आज अनेक महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. तुम्हाला हे ही वाचून आश्चर्य वाटेल की त्यांनी १२०० रुपयांपासून त्यांचा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांनी ५० हजार कोटी रुपयांची कंपनी सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांनी ही कंपनी कशी उभी केली.

किरण मुजूमदार ज्यांनी १२०० रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला त्यांना फोर्ब्स मासिकाने जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीतही समाविष्ट केले आहे. दरम्यान, एक वेळ अशी होती की त्यांनी खुप कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता पण कोणीही त्यांना नोकरी दिली नाही.

केवळ एक महिला असल्यामुळे त्यांना कोणत्यीह कंपनीत नोकरी मिळत नव्हती. एका महिलेला अशी वागणूक मिळाल्यानंतर त्यांनी केवळ १२०० रुपयांत आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सध्या ही कंपनी ३७ हजार करोड रूपयांपेक्षा जास्त रूपयांची कंपनी बनली आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या किरण मजुमदार यांचा जन्म बेंगळुरूमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९७८ मध्ये जेव्हा त्या ऑस्ट्रेलियामधून मद्यनिर्मिती प्रक्रियेत पदव्युत्तर पदवी घेऊन भारतात परत आल्या तेव्हा भारतातील अनेक बिअर उत्पादकांनी त्यांना एक स्त्री असल्याने नोकरी देण्यास नकार दिला होता.

यावेळी त्या केवळ २५ वर्षांच्या होत्या. भारतात नोकरी न मिळाल्यामुळे त्या स्कॉटलंडला गेल्या. तेथे त्यांनी ब्रेव्हर म्हणून काम केले. येथेच त्यांचे भाग्य बदलले आणि बायोकॉनच्या स्थापनेचा मार्ग उघडला. त्यांचे नशीब त्यांना साथ देत होते.

यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. स्कॉटलंडमध्ये काम करत असतानाच त्यांची भेट आयरिश उद्योजक लेस्ली ऑचिन्क्लॉसशी झाली. त्या काळात लेस्लीला भारतातील फार्मा क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा होता. किरण यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी किरण यांना भारतातील व्यवसाय सांभाळण्याची ऑफर दिली.

दरम्यान, अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना थोडीशी भिती वाटत होती त्यामुळे त्या नकार देत होत्या. असे असूनही लेस्लीने ऐकले नाही आणि किरण यांना या व्यवसायाचा कारभार हाती घेण्यास भाग पाडले. अशाप्रकारे १८७८ मध्ये बायोकॉनची स्थापना झाली.

आज ही एक खुप मोठी फार्मा कंपनी आहे. आणि किरण या हजारो कोटींच्या मालकीण आहेत. अनेक स्त्रीयांसाठी त्या प्रेरणा बनल्या आहेत. त्यांनी हे दाखवून दिले आहे की कोणतीही स्त्री कमजोर नसते. जर स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
रेमडीसीवीरसाठी खूप लोकांनी मागणी केली पण कोरोनील हवे ही मागणी कुणीच केली नाही
साऊथची टॉपची अभिनेत्री तृषा आणि राणा दग्गूबत्तीचे ‘या’ कारणामूळे होऊ शकले नाही लग्न
शिव नादर: खाजगी नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने सुरू केली कंपनी, आज आहेत १.७० लाख कोटींचे मालक
दोन वेळा शाळेत नापास झालेल्या मुलाने उभी केली २५ हजार कोटींची कंपनी, वाचा झोमाटोची यशोगाथा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.