बाॅलीवूड पुन्हा हादरले! भाजपची खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ब्लड कॅन्सर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तसेच भाजपा खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सध्या मुंबईमधील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत किरण खेर यांचे पती अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनुपम खेर यांनी एक ट्वीट करत म्हंटले आहे की, ‘माझी पत्नी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती एक फायटर आहे आणि ती या आजारावर लवकर मात करेन.’

‘तिची प्रकृती स्थिर आहे. किरण लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा’ असे अनुपम यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटवर चाहत्यांनी कमेंट करत किरण खेर लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे.

दरम्यान, किरण खेर या २०१४ साली पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकत खासदारकी मिळवली.

अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेल्या किरण यांनी १९९० साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या  

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद करा; काॅंग्रेस नेत्याचा निशाणा

Video: पाहुणा बनून आहेर घेऊन पळून जायचा, लोकांच्या हाती लागला तर लोकांनी चोप चोप चोपला

सावधान! शरद पवारांसंबंधी विकृत लिखान करणारांविरोधात राष्ट्रवादी चवताळली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.