कॅन्सरमुळे खुपच खराब झाल्या आहेत किरण खेर; पहिल्यांदाच समोर आले उपचार सुरु असतानाचे फोटो

अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर या ब्लड कॅन्सरशी लढत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे, मात्र उपचारानंतर त्या पहिलांदाच समोर आल्या आहे. ब्लड कॅन्सरमुळे त्यांची परिस्थिती खुप बिघडली असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी अनुपम खेर हे कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किरण खेर सुद्धा आल्या होत्या. त्यावेळी कॅन्सरमुळे त्यांची प्रकृती खुप बिघडली असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे केस गळले असून त्यांच्या चेहऱ्यावरचे तेजही कमी झाले आहे.

किरण खेर यांनी फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉप घातलेला आहे. तसेच चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे. यावेळी किरण खेर खुप आजारी असल्याच्या दिसत आहे. तसेच त्यांच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचेही दिसून येत आहे.

अनुपम खेर यांनी फोटो शेअर करत म्हटले आहे, की मी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. आता आई, किरण, वहिणी आणि भावाने पण कोरोनाची लस घेतली आहे. तुम्ही पण घरीच रहा आणि कोरोनाची लस लवकरात लवकर घ्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही लोकांनी किरण खेर यांच्या निधनाची अफवा परवली होती. त्यावेळी अनुपम खेरने ट्विट करुन हे थांबवण्यास सांगितले होते. किरण यांच्या प्रकृतीबद्दल अनेक लोक अफवा पसरवत आहे. हे सर्व खोटं आहे. किरण पुर्ण बरी असून तिने कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला आहे, असे अनुपम खेरने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

सर्व पुरुष असेच असतात का? घरातील ‘ते’ खाजगी फोटो शेअर करत शाहीद कपूरच्या पत्नीचा प्रश्न; पहा फोटो..
भाड्याने पंडित देण्याचा सुरू केला बिजनेस, दरवर्षी कमावतात ७० कोटी रूपये
महाराष्ट्र कोरोनाशी चांगला लढतोय; पंतप्रधान मोदींनी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून केले कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.