Homeताज्या बातम्याधक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा ३१ व्या वर्षी अचानक झाला मृत्यु, मनोरंजनविश्वात उडाली खळबळ

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा ३१ व्या वर्षी अचानक झाला मृत्यु, मनोरंजनविश्वात उडाली खळबळ

दक्षिण कोरियाच्या मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री किम मी सूचे निधन झाले आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच जगभरातील अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. किमच्या अचानक झालेल्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

‘स्नोड्रॉप’ फेम किम मी सूचे ५ जानेवारी रोजी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्रीचा मृत्यू का आणि कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु तिच्या एजन्सीने अधिकृत निवेदन देताना तिच्या मृत्यूची बातमी चाहत्यांना आणि मीडियाशी शेअर केली आहे. जिथे त्यांनी अभिनेत्रीचे अंतिम संस्कार तानेंग सुंगसिम पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती दिली.

एजन्सीने तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे की किमच्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणत्याही अफवा आणि अनुमानांकडे लक्ष देऊ नका आणि त्यात सहभागी होऊ नका. कारण यावेळी अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यामुळे अशी कोणतीही अफवा त्यांच्यासाठी वेदनादायक ठरु शकते.

पडद्यावर दमदार अभिनय करुन किमने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडली होती. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते होते. किमच्या कामाबद्दल सांगायचे तर तिने हाय बाय मामा, द स्कूल नर्स फाइल्स आणि युमीच्या सेल प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे आणि आता अलीकडेच ती स्नोड्रॉपच्या माध्यमातून चर्चेत आली होती.

दक्षिण कोरियाची टीव्ही मालिका स्नोड्रॉप सध्या वादात आहे. कारण या मालिकेत १९८० च्या दशकात दक्षिण कोरियामधील लोकशाही समर्थक चळवळीचा विपर्यास केला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा योजनेसाठी वाईट समजल्या जाणाऱ्या एजन्सीचा गौरव केल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे.

हा शो दक्षिण कोरियामध्ये जेटीबीसी नावाच्या टीव्ही चॅनलवर प्रसारित केला जातो. या मालिकेबाबत काही लोक अफवा पसरवत असून अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चॅनलने काही दिवसांपूर्वी दाखवली होती. अशातच या मालिकेतील अभिनेत्री किमचे निधन झाल्यामुळे मनोरंजन विश्वातच एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
शेअर मार्केटमध्ये तेजी कायम; जाणून घ्या आजच्या टाॅप शेअर्सबद्दल…
”पंजाबमधील घटनेमागे अमित शाहांचा हात?” बड्या नेत्याच्या आरोपांनी उडाली खळबळ
माजी मुख्यमंत्री राणेंना मिळणार आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय