Share

नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या; देश हादरला

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दहा दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या व्यक्तीची राजस्थानमधील उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.(Killing of a person who posted in support of Nupur Sharma )

मिळालेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय कन्हैयालाल तेली यांचे उदयपूरमधील मालदास गल्लीतील भूतमहालजवळ सुप्रीम टेलर्स नावाने एक दुकान आहे. मंगळवारी सकाळी काहीजण कन्हैयालाल यांच्या दुकानात घुसले आणि त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी कन्हैयालाल यांच्या मानेवर अनेक वार केले.

या हल्ल्यात कन्हैयालाल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. या हल्ल्यानंतर आरोपींनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी रक्ताने माखलेली शस्त्रे दाखवून पंतप्रधान मोदींना इशारा देताना दिसत आहेत. या घटनेनंतर उदयपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हत्याकांडाच्या निषेधार्थ लोकांनी निदर्शने केली आहेत. उदयपूरमधील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनस्थळी दाखल झाले आहेत. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उदयपूर जिल्ह्यात पुढील २४ तासांसाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. ” मी या घटनेचा निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो”, असे ट्विट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून कन्हैयालाल तेली यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. कन्हैयालाल तेली यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कन्हैयालाल तेली यांना सुरक्षा देखील पुरवली होती. पण मंगळवारी कन्हैयालाल तेली सुरक्षेशिवाय दुकानात गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसैनिकांची साथ कोणाला? उद्धव ठाकरेेंना का एकनाथ शिंदेना? सर्वेतून महत्वाची माहिती समोर
काय सांगता? बाहुल्यासोबत लग्न केल्यानंतर महिलेने दिला बाळाला जन्म, फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक
आमदार शिंदेंच्या बाजूने असले तरी जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने, सर्वेतून झाला मोठा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now