सॅटलाइटद्वारे ऑनलाइन मशीन गन कंट्रोल करुन इराणच्या शास्त्रज्ञाची हत्या

मागच्या आठवड्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे मुख्य वैज्ञानिक मोहसेन फाखरीजादेह यांची तेहरानजवळ हत्या करण्यात आली. यानंतर इराण संतप्त झाला होता. आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची हत्या अत्याधुनिक टेक्नोलॉजी वापरुन करण्यात आली.

मोहसीन फाखरीझादेह यांच्यावर सॅटलाइटने नियंत्रित होणाऱ्या मशीन गनमधून गोळया झाडण्यात आल्या आहेत. इराणची राजधानी तेहरान बाहेरील रस्त्यावरुन मोहसीन फाखरीझादेह यांची कार धावत होती. त्यावेळी मशीन गनने त्यांच्या चेहऱ्यावर झूम करुन १३ गोळया झाडल्या गेल्या.

तर फाखरीझादेह यांच्यापासून त्यांची पत्नी १० इंच अंतरावर बसली होती. पण तिला एकही गोळी लागली नाही. सॅटलाइटच्या माध्यमातून मशीन गन ऑनलाइन कंट्रोल करण्यात आली. अत्याधुनिक कॅमेऱ्याचाही वापर करण्यात आला.

निसान पिकअपच्या छोटया ट्रकवर ही मशीन गन बसवण्यात आली होती. मशीन गनने मोहसीन फाखरीझादेह यांच्या चेहऱ्याभोवती फोकस करुन गोळया झाडल्या. फखरीजादेह इराणचे महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ आणि IRGCचे ज्येष्ठ अधिकारी होते. इरान आपल्या अव्वल वैज्ञानिकांच्या मृत्यूच्या दु: खामध्ये मग्न आहे. समर्थकांच्या मोठ्या संख्येने त्यांना निरोप देण्यात आला. तर अनेक नेत्यांनी त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचे कबूल केले.

कृषी कायद्यावरून शरद पवारांची दुटप्पी भूमिका.? जाणून घ्या ‘त्या’ पत्रामागील सत्यता…

देशात कोरोनाची दुसरी लाट? तज्ञ म्हणतात, कोरोना लसीशिवाय पर्याय नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.