कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार? सिद्धार्थने सांगितला प्लॅन

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांची चर्चा सुरू आहे. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची देखील चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी ते दोघे एकत्र असतात. नुकताच आलेला शेरशाह या चित्रपटात दोघे अधिकच जवळ आले होते.

यामुळे ते कधी लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी या चित्रपटात किसिंग सिन देखील दिले आहेत. त्यांनी लग्न करावे अशी चाहत्यांची देखील इच्छा आहे. आता एका मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या लग्नाच्या प्लॅन विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

मुलाखतीत त्याने त्याच्या लग्ना विषयी आणि कियारासोबत लग्न करणार यावर वक्तव्य केले आहे. मला माहित नाही माझे लग्न कधी होईल, मी ज्योतिषी नाही. लग्न कधी करणार या पेक्षा कोणाशी लग्न करणार हे महत्त्वाचे आहे, असे त्याने यावेळी सांगितले आहे.

मी केव्हा आणि कोणाशी लग्न करेन हे मी नक्की सांगेन, ‘कियाराची मला एक गोष्ट आवडते, ती म्हणजे ऑफ-कॅमेरा ती वेगळी आहे. तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती एक अभिनेत्री आहे, असे म्हणत त्याने कियाराचे कौतुक केले आहे. यामुळे सस्पेंस कायम आहे.

ती सामान्य लोकांसारखी राहते आणि मला तिचा हा गुण आवडतो. यामुळे आता तो तिच्यासोबत लग्न करणार की दुसरं कोणाबरोबर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी एकत्र असतात, याबाबत उघडपणे त्यांनी अजूनही खुलासा केला नाही. यामुळे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे, मात्र, तिची माझ्यासोबत कोणतीही लव्ह स्टोरी नाही. तर कियाराने त्याच्यासोबत एक लव्ह स्टोरी असलेला चित्रपट करावा, अशी इच्छा असल्याचे सिद्धार्थने सांगितले, गेल्या काही दिवसांपासून त्यांची जवळीक वाढत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.