Kia च्या इलेक्ट्रिक गाड्यांची काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, एकदा चार्ज केली की धावते ५१० किमी…

मुंबई । देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहेत. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे.

प्रदूषण तसेच पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. अनेक गाड्या आल्या देखील आहेत.

दरम्यान, कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने (Kia Corporation / Automobile manufacturer) त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारने आधी कोरियन आणि युरोपियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. त्यानंतर आता या कारला अमेरीकन बाजारातही मोठी मागणी आहे.

यामध्ये बुकिंग घेण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासांतच सर्व वाहने बुक झाली आहेत. बुकिंगच्या पहिल्या टप्प्यात १५०० युनिट्स बुकिंगसाठी ठेवण्यात आले होते. अवघ्या काही तासात कंपनीला बुकिंग्स मिळाल्या आहेत. यामुळे या गाडीची लोकप्रियता दिसून येत आहे.

यामध्ये Kia EV6 कंपनीची पहिली फुल इलेक्ट्रिक कार आहे जी इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) आधारित आहे. या कारमध्ये 400v आणि 800v चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. ही एसयूव्ही फक्त 5 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर 112 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. आणि 18 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 330 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.

यामुळे या गाडीला मोठी पसंती मिळत आहे. बॅटरीच्या मदतीने ही ईव्ही अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते. ही कार केवळ 4.30 मिनिटं चार्ज केली तरी ही कार किमान 100 किलोमीटरपर्यंत धावते. यामुळे ही गाडी फायदेशीर आहे.

ताज्या बातम्या

रतन टाटा देखील ‘या’ २८ वर्षाच्या तरुणाकडून घेतात सल्ला, जाणून घ्या कारण…

‘देवमाणूस’मधला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा; कारण वाचून डोळे पाणावतील

आरारारा खतरनाक…, इंग्लडची राणी एलिझाबेथनं कापला तलवारीनं केक, व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.