Kia ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार घेण्यासाठी नागरीकांची झुंबड, सिंगल चार्जमध्ये धावते ५१० किमी

आता सध्या इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ खुप वाढली आहे. पेट्रोलचे भाव वाढले असताना आता सगळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. अनेक लोक आता इलेक्ट्रिक वाहने वापरत आहेत. अनेक कंपन्यांनी आता नवनवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे.

आधीच्या काळात इलेक्ट्रिक वाहने खुप महाग असायची त्यामुळे अनेकांना ती परवडत नव्हती. पण आता ती वाहनेही स्वस्त झाली आहेत. आता कार किंवा मोटरसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्यावर जोर देत आहेत.

आता कोरीयन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कंपनी लॉन्च केली आहे. या कारने लॉन्च होताच मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. या कारला युरोपियन बाजारातही ग्राहकांकडून खुप पसंती मिळत आहे.

कंपनीला जबरदस्त ऑर्डर्स मिळत आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या महिन्यात दक्षिण कोरीयामध्ये एका डेडीकेटेड प्लॅटफॉर्मवर त्यांची क्रॉसओव्हर ईव्ही लाँच केली होती. या कारला लाँन्चिंगच्या दिवशीच २१ हजार १६ ऑर्डर्स मिळाल्या होत्या.

२०१६ पर्यंत किआ ७ इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात उतरवणार आहे. ईव्ही ६ हे त्यांचे पहिले मॉडेल आहे. कारचे फ्रंट पॅनल आधुनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते.

ही कार ४६८० मिमी लांब आहे. किआ ईव्ही ६ दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 58kwh आणि 77.4kwh पर्याय आहेत. ही कार अवघ्या ३.५ सेकंदात १०० किमी प्रतितासाचा वेग पकडते. तसेच केबिनमध्येही खुप मोठी जागा आहे.

यामध्ये ८०० व्होल्टची चार्जिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे ही कार १८ मिनिटांत ८० टक्के चार्ज होते. कंपनीचे म्हणणे आहे की ही कार फक्त १० मिनिटे चार्ज केली तरी १०० किमी चालू शकते. तर जर या कारला पुर्णपणे चार्ज केले तर ही ५०० किलोमीटरपर्यंत धावते. यामध्ये अनेक व्हेरीएंट्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये २ व्हील ड्राईव्ह आणि ऑल व्हील ड्राईव्हचा ऑप्शन उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या
उत्तराखंडमध्ये कोरोनाचा हाहाकार! कुंभमेळ्यानंतर कोरोना रुग्णसंख्या १८०० टक्क्यांनी वाढली
कोरोनाचा हाहाकार! कोरोनामुळे पतीच्या मृत्युनंतर पत्नीने नवव्या मजल्यावरुन उडी मारत जीवन यात्रा संपवली
भारतातील चहाने या विदेशी महिलेला बनवले करोडपती, वाचा एक रोमांचक कहाणी
सावधान! विमा कंपन्यांनी केल्या कोविड पॉलिसी बंद; क्लेम वाढत असल्यामुळे घेतला निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.