चहासोबत खारी टोस्ट खाताय तर पाहा हा व्हिडिओ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल

गुवाहाटी मधील एका पाणीपुरीवाल्याचा पणीपुरीत लघवी मिसळण्याचा प्रताप ऐकल्यानंतर आता अशीच एक घटना समोर आली आहे ती म्हणजे आपण चहा सोबत खातो त्या खारी बटरची. अनेक लोकांना चहा सोबत खारी बटर खाण्याची सवय असते.

पण आता सोशल मीडियावर एका महाशयाचा प्रताप ऐकल्यानंतर तुम्हीही खारी टोस्ट खाण्याचे विसरून जाल..सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ अद्याप कुठला आहे हे समजल नसलं तरी हा व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल.

या व्हिडिओमध्ये काही कामगार खारी आणि टोस्ट तयार झाल्यानंतर पॅकिंग करताना दिसत आहे. यातील एक व्यक्ती खारी टोस्टवर पाय ठेऊन ते टोस्ट दाबताना दिसत आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ एक व्यक्ती काढत आहे. तर व्हिडीओमध्ये पुढे दुसरी व्यक्ती तेच टोस्ट आणि खारी चाटून पॅकिंग करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये या कामगारांनी केलेल्या कृत्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हे कामगार खारी टोस्टचे पॅकिंग करताना त्यावर पाय देऊन घृणास्पद कृत्य करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झाले नसले तरी अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांचे चेहरे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. लोकांकडून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई होऊन शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

याआधीही अशाच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत आलो आहोत. पाव बनवण्यासाठी जो मैदा वापरतात तो व्यवस्थित गोंदावा लागतो. याआधीही बेकरीमधील पायाने मैदा तुडवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे हे अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्यांचे कृत्य कधी बंद होणार याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.

 

महत्वाच्या बातम्या
रात्रीत मालामाल झाला शेतकरी! बॅंक खात्यात अचानक आले ५२ कोटी; जाणून घ्या पुर्ण प्रकरण
TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!
बुरखा घालून कॉलेजमध्ये फिरत होता तरुण, शिक्षिकांनी त्याला बुटावरुन ओळखले अन् पुढे….
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी पुणे पुर्णपणे बंद, कठोर निर्बंध लावण्याचा अजितदादांचा आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.