साऊथ अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षकांमध्ये ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. (kgf 2 release on amazone prime video)
ज्या चाहत्यांना चित्रपटगृहामध्ये ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट पाहता आला नाही, त्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ३ जूनपासून अमेझॉन प्राइम या OTT प्लॅटफॉर्मवर ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जगभरातील २४० हून अधिक देशांमधील प्राइम ग्राहकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. या चित्रपटाने भारतात ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.
‘KGF Chapter 2’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात राव रमेश ईश्वरी राव, अच्युत कुमार आणि अर्चना जोइस यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला होता.
‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने या वर्षातील आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाचे डिजिटल हक्क तब्बल ३२० कोटी रुपयांमध्ये विकले गेल्याची माहिती मिळत आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने याबाबतीत देखील नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
या चित्रपटाचा पुढील भाग देखील लवकरच प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटामध्ये देखील नवीन भागासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं; पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ
गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं! डोक्यावर जखमांच्या खुणा; पोलिसांनी घेतली ‘ही’ ॲक्शन
वा रे पठ्ठ्या! तिकीटाच्या 2 रुपयांसाठी रेल्वेला खेचलं कोर्टात, शेवटी केस जिंकत मिळवले अडीच कोटी