Share

KGF 2 ने OTT चेही रेकॉर्ड मोडले, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विकले गेले डिजिटल हक्क

साऊथ सुपरस्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन(Ravina Tondon) यांनी भूमिका केल्या आहेत. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल ३९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.(KGF 2 breaks OTT record, sells digital rights for 320 corers)

सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाचे डिजिटल हक्क एका OTT प्लॅटफॉर्मला विकण्यात आले आहेत. यासाठी OTT प्लॅटफॉर्मला करोडो रुपये मोजावे लागले आहेत.

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाचे डिजिटल हक्क तब्बल 320 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने याबाबतीत देखील नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. २७ मे २०२२ रोजी ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या चित्रपटाने OTT चे देखील रेकॉर्ड मोडले आहेत. आतापर्यंत राधे या चित्रपटाला सर्वात जास्त किंमतीत OTT प्लॅटफॉर्मकडून विकत घेण्यात आले आहे. या चित्रपटासाठी एका OTT प्लॅटफॉर्मने तब्बल २५० कोटी रुपये मोजले होते. यानंतर अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटासाठी OTT प्लॅटफॉर्मला १२५ कोटी रुपये मोजावे लागले होते.

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘भुज द प्राईड’ या चित्रपटाचे डिजीटल हक्क ११० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले होते. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट असलेल्या ‘दिल बेचारा’ साठी एका OTT प्लॅटफॉर्मला ४० कोटी रुपये मोजावे लागले होते. या तुलनेत ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाला मोठी रक्कम मिळाली आहे.

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १,०५४.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने देशभरात ७५२ कोटी रुपये कमावले आहेत. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११०० कोटी रुपये कमावले आहेत. RRR हा चित्रपट २० मे रोजी नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राणांच्या विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा; न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले
एकमेकींच्या प्रेमात वेड्या झाल्या तरुणी, पोलिस ठाण्यात पोहचून घातला हायव्होल्टेज ड्रामा
मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! दोन नगरसेवकांसह ‘हा’ मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now