लाडक्या बाप्पासमोर केतकी माटेगावकरने गायले गाणे; ऐकून तुम्हीही भारावून जाल..

अभिनेत्री केतकी माटेगावकर ही सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत असते. तिच्या स्मित हास्याने आणि उत्तम आवाजाने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्री व्यतिरिक्त ती उत्कृष्ट गायिका देखील आहे.

अनेक कलाकारांच्या घरी गणेश चतुर्थी पासून बाप्पा विराजमान झाले असून कोरोनामुळे निर्बंध लावले असेल तरी मानसिक उत्साह हा आधीसारखाच कायम आहे. नुकताच केतकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. यात केतकी आपल्या लाडक्या विघ्न्हर्त्याला एक गाणे अर्पण करीत आहे.

मंत्रमुग्ध करणाऱ्या केतकीच्या आवाजात बाप्पाचे गाणे ऐकायला मिळणे म्हणजे सोने पे सुहागा असेच म्हणावे लागेल. केतकीच्या या व्हिडिओवर नेटक-यांनी भरभरून पसंती दिलेली असून व्हिडिओला प्रचंड प्रमाणत लाईक्स मिळालेले आहेत.

टाईमपास या चित्रपटामधील ‘मला वेड लागले’ भातुकली मधील ‘तारा तारा’ अशी अनेक प्रकारची गाणी तिने गायली आहेत. दररोज चार तास गाण्याचा सराव करते असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

तिने याआधी ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’ अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. अभिनयाप्रमाणे तिला गाण्याची सुद्धा आवड आहे केतकी एक संगीत परिवारातील आहे. तिचे वडील प्रसाद माटेगावकर हे संगीत दिग्दर्शक आहेत आणि आई सुवर्णा गायिका आहे.

तिच्या ऑनस्क्रिन लूक प्रमाणे ऑफस्क्रिन लूकलाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर ती फोटोजमध्ये अनेक अदा पाहायला मिळतात. केतकीने तिच्या लूकमध्ये अनेक बदल केले आहेत. तिच्या जुन्या आणि आत्ताचे फोटोज पाहिले तर तिच्या लूकमध्ये झालेला बदल लगेचच दिसून येतो. ‘टाईमपास’ या चित्रपटामुळे केतकीला अनेकजण ओळखू लागले तसेच अनेकांना ती आवडू लागली.

 

महत्वाच्या बातम्या
काय सांगता? मोदी सरकार घरबसल्या देणार ५०,००० रुपये, पण करावे लागेल ‘हे’ काम
साकीनाका बलात्काराचा तपास करण्यासाठी जोत्सना रासम यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे जोत्सना रासम
गणपतीसाठी’मोदक’ बनवण्याची आगळीवेगळी पद्धत; अशाप्रकारे बनवा लाजवाब मोदक..
अक्षय कुमारने वाढदिवसाच्या दिवशी आईसोबत फोटो शेअर करून लिहिले असे काही वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.