‘तेरी नौटंकी मैं…’ म्हणत केतकी माटेगावरने केले फोटो शेअर, नेमकं काय म्हणायचंय तिला? वाचा

सेलिब्रिटी नेहमीच आपले वेगवेगळे फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असतात. त्यात सेलिब्रिटींचा कोणता फोटो चाहत्यांना प्रचंड आवडेल आणि कोणता फोटो क्षणार्धात व्हायरल होईल हे सांगता येत नाही.

अशात सारेगमप या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवलेल्या केतकी माटेगावकरने एक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना इतका आवडला आहे की काही तासाचत तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

या फोटोत केतकी सुपरक्युट दिसत आहे. तिने एका गार्डनमध्ये हे फोटो शुट केले असून तिच्या या लुकने तिच्या चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. ‘तेरी नौटंकी मैं’ असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

कला विश्वात केतकीने आपली ओळख क्युट चेहऱ्याची अभिनेत्री आणि सुंदर आवाज असणारी गायिका म्हणून निर्माण केली आहे. केतकी सारेगमप या कार्यक्रमातून तिने आपली ओळख निर्माण केली होती.

केतकी नेहमीच सोशल मीडियावर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळे फोटो पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिने अभिनेत्री म्हणून ‘टाईमपास’ चित्रपटात काम केले होते. तिचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.