वाद अंगावर घेण्याची सवयच आहे केतकीला! आजवर ‘या’ कारणांमुळे सापडलीय प्रचंड वादात

सध्या अभिनेत्री केतकी चितळे खूप चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे(Ketaki Chitale) हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(ketaki chitale and conterversy had long relation)

यापूर्वी देखील अभिनेत्री केतकी चितळे अनेकवेळा वादात सापडली होती. काही दिवसांपूर्वी कॉमेडीयन सौरभ घोष आणि आग्रीमा जोशूआ यांनी शिवाजी महाराजांवर विनोद केल्यामूळे त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळे हीने आपलं मतं मांडलं होतं. तिने फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेला मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. या पोस्टमध्ये अभिनेत्री केतकी चितळेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याचबरोबर या पोस्टमध्ये तिने बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांचा देखील एकेरी उल्लेख केला होता. यावरून मराठी अभिनेत्री केतकी चितळेला टीकेचा सामना करावा लागला होता.

या प्रकरणानंतर काही दिवसांनी केतकीने आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये अभिनेत्री केतकी चितळेने दारु पितानाचा आणि दुसऱ्या बाजूला तिने दारुमधून सरकारला मिळणाऱ्या कराचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमूळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं होतं.

त्यापूर्वी केतकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग रेल्वेने फुकट प्रवास करुन मुंबईला येतो, असे वक्तव्य केलं होतं. यावरून अभिनेत्री केतकी चितळेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे अनेकदा वादात सापडली असल्याचे दिसून येते.

शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात आज ठाणे पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई केली आहे. या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पाकिस्तानात असता तर आमच्यासाठी.., उमरान मलिकबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य
जाणून घ्या केतकीचा अभिनेत्री म्हणून प्रवास, ‘या’ आजाराने आहे त्रस्त; दिग्दर्शकावर केले होते ‘हे’ गंभीर आरोप
त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी दिला राजीनामा, भाजपने विनोद तावडेंवर सोपवली मोठी जबाबदारी