प्रत्येक कंपनी(Company) आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही भेटवस्तू किंवा बोनस देत असते. केरळमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसने मर्सिडीज बेंझ(Mercedes Benz) ही कार भेट म्हणून दिली आहे. सीआर अनिश हे गेल्या २२ वर्षांपासून व्यावसायिक एके शाजी यांच्यासाठी काम करत आहेत.(kerla boss gift mercedes benz car to his employe)
सीआर अनिश यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या बदल्यात त्यांना व्यावसायिक एके शाजी यांनी मर्सिडीज-बेंझ जीएलए क्लास २२० डी ही लक्झरी कार भेट दिली आहे. या कारची किंमत सुमारे ४५ लाख रुपये आहे. यावर सीआर अनिश यांनी सांगितले की, ‘ही त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी भेटवस्तू आहे.’
उद्योगपती एके शाजी हे ‘MyG’ नावाच्या डिजिटल रिटेल स्टोअरचे मालक आहेत आणि सीआर अनिश त्यांच्या कंपनीत मुख्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून काम करतात. एके शाजी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम(Instagaram) अकाऊंटवर अनिश आणि त्याच्या कुटुंबीयांना काळ्या रंगातील लक्झरी कार भेट देतानाचा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत एके शाजी यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “प्रिय अनी… गेल्या २२ वर्षांपासून तू माझ्यासोबत चांगलं काम करत आहेस. आशा आहे की तुला ही भेट आवडली असेल.” एके शाजी यांनी सीआर अनिशला व त्याच्या कुटूंबियांना मर्सिडीज-बेंझ कार भेट देतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये व्यावसायिक एके शाजी म्हणतात, “अनिश हा कर्मचारी नाही तर बिझनेस पार्टनरसारखा आहे. मी खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.” ‘MyG’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या पार्टीत एके शाजी यांनी कर्मचारी सीआर अनिशला मर्सिडीज-बेंझ कार भेट देऊन आश्चर्यचकित केले.
सीआर अनिश हा ‘MyG’ कंपनीची स्थापना होण्याच्या आधीपासून एके शाजी यांच्याशी जोडला गेला आहे. त्याने मार्केटिंग, मेंटेनन्स आणि युनिट डेव्हलपमेंटसह विविध विभागात काम केले आहे. अनिश उत्तर केरळमधील कोझिकोड या जिल्ह्यात राहतो. भेटवस्तू घेतल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना अनिश म्हणाला की, “हे सर्व तुमच्या पाठिंब्यामुळेच घडले आहे. भविष्यातही तुम्ही माझ्यासोबत राहाल अशी मला आशा आहे.”
महत्वाच्या बातम्या :-
#SSMB28: महेश बाबूच्या 100 कोटींच्या सिनेमात या साऊथ हसीनाची एन्ट्री, जाणून घ्या नाव
रामदास आठवलेंनी घेतला शशी थरूर यांचा इंग्रजीचा क्लास, गंमतीशीर ट्विट्स झाले व्हायरल
पुन्हा मुळशी पॅटर्न! पुण्यात मोहोळ आणि शेलार टोळीयुद्धाचा भडका, घटना CCTV मध्ये कैद