पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप, मॉर्निंग वॉकसाठी आणि मुलांच्या स्केटिंगसाठी बंद केला रस्ता

काही दिवसांपूर्वी एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर या आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता केरळमधील कोचीमधून(Kochi) अशीच एक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकसाठी संपूर्ण रस्ता अडवला आहे.(kerala police officer vijay pillai Closed road for morning walks and children’s skating)

यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद पिल्लई मॉर्निंग वॉकसाठी आणि स्वतःच्या मुलांना स्केटिंगचा सराव करता यावा यासाठी सकाळी रस्ता अडवत होते. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद पिल्लई यांना नोटीस बजावण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद पिल्लई मॉर्निंग वॉकसाठी दररोज क्वीन्स वॉकवे हा रस्ता अडवत होते. त्यामुळे त्या वेळेत सर्व वाहने आणि लोकांना थांबवले जात होते. यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

तसेच विनोद पिल्लई यांच्या मुलांना सायकलिंग आणि स्केटिंगचा सराव करता यावा यासाठी सुद्धा रविवारी हा रस्ता सकाळी ६ ते ७ या वेळेत बंद केला जात होता. या प्रकरणात स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद पिल्लई यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाशी संबंधित छायाचित्रे व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील त्यागराज मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंना आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांनी स्वतःच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी रोखले होते. आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांनी संपूर्ण मैदान मोकळे केले होते.

सर्व खेळाडूंना मैदानाबाहेर काढले होते. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची लडाखला बदली करण्यात आली होती. तसेच आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची पत्नी रिंकी दुग्गा यांची देखील बदली करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :-
रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला दिली होती धमकी, म्हणाला होता, ‘मॅच जिंकलो की मग याला बघतो’
स्वार्थी होते भारतीय खेळाडू, चिप्ससाठी पुर्ण सिरीज टाकली होती धोक्यात, टिम पेनचा मोठा खुलासा
..तेव्हा आम्ही ३६ वर ऑलआऊट झालो होतो, ‘त्या’ सिरीजचा अनुभव सांगताना रहाणेला अश्रू अनावर