१८ वर्षाच्या पोराने तयार केली भंगारापासून भन्नाट कार लोकांनी केली एलॉन मस्कशी तुलना

 

ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर माणूस काहीही करु शकतो, हे आता सिद्ध करुन दाखवले आहे अफ्रिकेच्या एका १८ वर्षाच्या मुलाने. अफ्रिकेत राहणाऱ्या या मुलाने आता भंगारापासून एक कार तयार केली आहे.

पश्चिम अफ्रिकेच्या घानामध्ये राहणाऱ्या या मुलाचे नाव केल्विन असे आहे. त्याने भंगारातील सामानामधून एक कार तयार केली आहे. तो ही कार तिथल्या आसपासच्या परिसरात चालवतो.

आपल्याला हे ऐकायला खुप सोपे वाटत असले तरी हे एक आश्चर्याचा धक्का देणारे आहे, कारण केल्विनने कुठल्याही डिग्री शिवाय त्याने ही कार तयार केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला अफ्रिकेचा एलॉन मस्क म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

केल्विनने ही कार तयार करण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही.त्याने ही कार तयार करण्यासाठी जंक यार्ड, कंस्ट्रक्शन साईट्स आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून कारसाठी भंगार गोळा केले.

नंतर जेव्हा त्याला कारसाठी इंजिनची गरज पडली तर त्याने नोकरी सुरु केली. त्यातुन मिळालेल्या पैशातून त्याने कारसाठी इंजिन खरेदी केले. गेल्या काही दिवसांपासून केल्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये केल्विन असे म्हणतोय की, मला इंजिनियर बनायचे होते, पण माझ्या घरची परिस्थिती चांगली नाहीये. त्यामुळे मला बनता आले नाही.

दहा वर्षाच्या वयातच त्याने वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. तो लहानपणापासून भंगारातल्या गोष्टी घेऊन रोबोट, खेळणी, विमान आणि वॅक्युम क्लिनरसारख्या वेगवेगळ्या गोष्टी बनवायचा.

जेव्हा त्याने कार बनवण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला विरोध केला, कारण त्याचे शिक्षणाकडे लागत नव्हते. पण केल्विनला माहित होते कि तो काय करतोय.

केल्विनने १५ वर्षाच्या वयातच कार बनवण्यास सुरुवात केली होती. त्याआधी ४ वर्षे तो कारच्या दुकानात जायचा आणि तिथे कारच्या डिझाईन्स बघायचा. तिथेच त्याने कारची डिझाईन कशी तयार करता येईल, हे शिकून घेतले.

केल्विन कमी वयाचा असल्याने त्याच्या शेजारचे त्याच्यावर खुप हसायचे. काही लोकांनी तर त्याला वेडं ठरवले होते. पण त्याने कधीच हार मानली नाही आणि तीन वर्षांच्या आत त्याने त्याची कार तयार करुन दाखवली.

विशेष म्हणजे या कारचे दरवाजे फरारी कारसारखे वरुन उघडतात. याशिवाय या कारची स्पीडसुद्धा चांगली आहे. आता जेव्हा पण तो कार घेऊन बाहेर पडतो, तेव्हा लोक त्याच्यासोबत फोटो काढतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.