Share

“मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याना हरवलं”

Charanjit-singh-channi.jp

पंजाब(Punjab) विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँगेसच्या मात्तबर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा देखील निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.(kejrivaal statement on win candidate labhsingh ubhoke)

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना ज्या उमेदवाराने पराभूत केलं, त्या उमेदवाराची सध्या पंजाबमध्ये चर्चा होत आहे. या उमेदवाराचे नाव लाभसिंग उगोके असं आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी या उमेदवारांचे कौतुक केलं आहे. पंजाबमधील विजयानंतर केलेल्या भाषणात अरविंद केजरीवाल यांनी लाभसिंग उगोके यांच्याबद्दल माहिती दिली आहे.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आपल्या भाषणात म्हणाले की, “तुम्हाला वाटेल एक सामान्य व्यक्ती काय करू शकते? तुम्हाला माहिती आहे का की चरणजीत सिंग चन्नी यांना कुणी हरवलं आहे? चरणजीत सिंग चन्नी यांना आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंग उगोके यांनी हरवलं आहे. लाभसिंग उगोके हे एका मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करतात.”

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात उमेदवार लाभसिंग उगोके यांच्या कुटुंबियांबद्दल देखील माहिती दिली. अरविंद केजरीवाल भाषणात म्हणाले की, “आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंग उगोके यांच्या आई सरकारी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. लाभसिंग उगोके यांचे वडील शेतात मजुरी करतात.”

“एका छोट्या मोबाईल दुरूस्त करणाऱ्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याला हरवलं आहे. आम आदमीची ताकद स्वतः आम आदमीनं ओळखावी”, असं आवाहन आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जनतेला केलं आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंग उगोके यांनी पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला आहे.

आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवनज्योत कौर यांनी काँग्रेसच्या नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव केला आहे. याबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ” नवज्योत सिंग सिद्धू यांना आमची सामान्य कार्यकर्ती जीवनज्योत कौर यांनी हरवलं आहे. सामान्य माणसात मोठी ताकद आहे. मी नेहमीच सांगतो सामान्य माणसाला आव्हान देऊ नका.”

महत्वाच्या बातम्या :-
भर उन्हात माणुसकीचे दर्शन! तळहातावर पाणी घेऊन पाजले सापाला, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
‘द काश्मिर फाईल्स’चा नवीन ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी, ट्रेलर पाहून तुमचीही वाढेल उत्सुकता
जडेजाला मिळाले त्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे बक्षिस, होल्डर, अश्विन, शाकिबला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now