Kedar Shinde Share Spiritual Story Of Swami Samarth: मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी अलीकडेच श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) महाराजांविषयी एक खास पोस्ट सोशल मीडियावर (social media) शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. स्वामी समर्थ महाराजांनी (Swami Samarth Maharaj) आपल्या आयुष्यात कसे मार्गदर्शन केले आणि आयुष्याला कलाटणी दिली, याविषयी केदार शिंदेंनी मनोगत व्यक्त केलं आहे.
“श्री स्वामी समर्थ की जय” – केदार शिंदे यांची सुरुवात
आपल्या पोस्टमध्ये केदार शिंदे (Kedar Shinde – Marathi Director, Writer) यांनी लिहिलं, “श्री स्वामी समर्थ महाराज की जय. १९९७ साली तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. त्याआधी मला तुमच्याविषयी फारशी माहिती नव्हती, कारण आमच्या घराण्यात कोणीही तुमची सेवा, भक्ती केली नव्हती. मात्र, ती संधी तुम्ही मला दिलीत, मार्ग दाखवला.”
“तुमच्यामुळे मी आज आहे”
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, “माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तुम्ही नसतात, तर मीही नसतो. कारण या २८ वर्षांमध्ये खूप स्थित्यंतर घडली. माझ्या प्रत्येक संकटात तुमचं छत्र माझ्यावर होतं.” तसंच त्यांनी प्रार्थना करत लिहिलं, “श्वासाचा शेवट तुमच्या नामानेच व्हावा, हीच तुमच्या पायी प्रार्थना आहे.”
२८ वर्षांचा एक योगायोग
याच दिवशी म्हणजे १९९७ रोजी केदार शिंदे यांचं गाजलेलं नाटक ‘आमच्यासारखे आम्हीच’ व्यावसायिक रंगभूमीवर सादर झालं होतं. या नाटकालाही यंदा २८ वर्ष पूर्ण झाली आहेत. “कदाचित त्याच दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन, मला स्वतःची ओळख करून दिलीत… ‘आमच्यासारखे आम्हीच’!” असं भावनिक म्हणत त्यांनी पोस्ट संपवली.
स्वामी समर्थांवर सेलिब्रिटींचा विश्वास
केदार शिंदे यांच्याप्रमाणेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार श्री स्वामी समर्थ महाराजांचे (Shree Swami Samarth) भक्त आहेत. काही दिवसांपूर्वी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या (Bollywood Actor) घरी त्यांच्या पादुकांचे पूजन देखील झाले होते. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपापल्या अनुभवांचे किस्से शेअर केले होते.