ब्रिटीश हवे होते अजून काही वर्षे; मराठीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकाने काढले सरकारचे वाभाडे

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांच्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

देशात इंग्रज अजून काहीवर्षे हवे होते, असे म्हणत केदार शिंदे यांनी कोरोनाच्या संकटात नाकर्तेपणा करणाऱ्या राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको.. स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण, दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वास सुध्दा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करून दिला नाही, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना, ब्रिटिश हवे होते अजून काही वर्ष.. आता ते हवे होते म्हणजे… किमान या जगण्याच्या महत्वाच्या सोई तरी व्यवस्थीत करून दिल्या असत्या, असे म्हणत शिंदे यांनी फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्य म्हटले आहे.

केदार शिंदे यांच्या या पोस्ट अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी आता इंग्रजच हवे होते, असे म्हटले आहे. तर एकाने आपल्याकडे कोणतीही गोष्ट राजकारण केल्याशिवाय पुढे जात नाही, असे म्हटले आहे. केदार शिंदे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाली आहे.

दरम्यान, केदार शिंदे हे मराठी सिनेमातले प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्यांनी अगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले, बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का, अशा मराठी सिनेमांमधून आपली ओळख निर्माण केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

जनतेचे हाल बघवत नाही म्हणून आमदाराने रेमडेसिवीरसाठी एफडी तोडून दिले ९० लाख
नवरीच्या डोळ्यात दोष म्हणत लग्नाला दिला नकार, मग मुलीच्या घरच्यांनी नवरदेवाला धु धु धुतला
रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं सरसावली; कोणी मारतंय झाडू, तर कोणी उचलतंय गाद्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.